शिरूर हवेली मतदारसंघाकडे अत्यंत चुरशीच्या लढतीमुळे तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!

Dhak Lekhanicha
0

 शिरूर हवेली मतदारसंघाकडे अत्यंत चुरशीच्या लढतीमुळे तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!


 शिरूर ( कार्यकारी संपादक सुदर्शन दरेकर)

विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मोठमोठ्या रांगा लावलेल्या होत्या. किरकोळ अपवाद  वगळता शिरूर व हवेली तालुक्यात शांततेने मतदान पार पडले शहरातील अनेक बुथवर रात्री आठ पर्यंत मतदान चालू होते.

 सरासरी 68.50 टक्के मतदान झाले असल्याचे रात्री उशिरा जाहीर करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार माऊली आबा कटके  व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांच्यात अटीतटीची लढत झाली असून विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी आपणास समजणार आहे.

 शिरूर शहरातील विद्याधाम प्रशाला मुंबई बाजार,सेंटर हायस्कूल,रयत हायस्कूल या ठिकाणी दुपारनंतर मतदारांच्या मोठ्या रांगा दिसून आल्या. लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा महायुती सरकारला दिसत असल्याचे जाणवले महिलांची लक्षणीय गर्दी प्रत्येक बुथवर दिसत होती.

 आमदार अशोक पवार यांचे  गाव वडगाव रासाई येथील मतदान केंद्रावर दुपारपर्यंत वेग कमी होता मात्र न्हावरे,तळेगाव ढमढेरे या ठिकाणी चार वाजेपर्यंत 55 टक्के मतदानाची नोंद झाली होती. शिरूर शहरात निवडणूक प्रशासनाच्या वतीने मोठा  बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. 

पर्यावरण जागृती या उपक्रमांतर्गत सेंटर शाळा या मतदान केंद्राला ग्रीन बूथ चे स्वरूप देण्यात आले होते.  

सी टी बोरा महाविद्यालयात गुलाबी बूथ तयार करण्यात आला होता तर विद्याधाम प्रशालेत युवा संचलित मतदान केंद्र उभारण्यात आले होते. महायुतीचे उमेदवार माऊली आबा कटके यांनी अखेरच्या टप्प्यात शिरूर शहरात  मतदान केंद्रांना भेटी दिल्या. त्यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधला व म्हणाले की शिरूर हवेली येथील सुजाण नागरिकांनी दडपशाही झुगारून मोठ्या प्रमाणात मतदान केले. 23 तारखेला होणारा विजय आपलाच आहे. हवेली तालुक्यातील मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने मतदानाचा टक्का वाढलेला दिसत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे  यांनी शहरातील मतदान केंद्रांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली.

 23 तारखेला मतदार कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!